कर्णबधिरांसाठी कामाची संधी
कापसे फाउंडेशनचं वेगळेपण याच्यात आहे की, त्यांनी अशी एक कल्पना राबविली की ज्यात पैठणीनिर्मितीला सामाजिक उद्दिष्ट्य मिळालं. ज्यांना कानांनी ऐकू येत नाही अशांना पैठणीनिर्मिती करण्याचं तंत्र शिकवलं आणि त्यांना रोजगारासह घर आणि नवं जीवन दिलं. तुमच्या आसपास असं कुणी असेल त्यांचं स्वागतच आहे.

पैठणी कला म्हणून संवर्धन
आमच्या प्रयत्नांना तुमची साथ हवी

पैठणी ही रेशमी धाग्यांचं महावस्त्र आहे. पण ‘कापसे पैठणी’ ही त्या रेशमी धाग्यांच्या गुंत्यात अडकून राहिली नाही, राहणारही नाही. ज्या समाजानं आपल्याला मोठं केलं, ज्या मातीनं आपलं पोट भरलं त्या मातीचं ऋण फेडण्यासाठीच कापसे फाउंडशेन हा उपक्रम आहे. आज कानानं ऐकू येत नसलेल्या शेकडो जणांचं ते कार्यालय आहे, घर आहे. त्यांच्यासोबत आदिवासी बांधवही इथं पैठणी विणताहेत. सगळे मिळून आम्ही महाराष्ट्राचं हे महावस्त्र विणण्याची कला जिवंत ठेवतो आहोत.
- बाळकृष्ण कापसे
कापसे फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त
आमच्याविषयी
कापसे फाउंडेशनमध्ये आपलं भरजरी स्वागत
अस्सल पैठणी ही येवल्याची ओळख. पण पैठणी निर्मिती हा केवळ व्यवसाय नाही, तर ते समाजाबद्दल असलेलं देणं आहे. हे आम्ही फक्त बोलत नाही, तर ते आम्ही आमच्या कृतीमधून सिद्ध केलं आहे. कापसे पैठणी संकुलात आज जवळपास दोनशेहून अधिक कर्णबधीर आणि आदिवासी विणकर येथं सन्मानानं आपलं पोट भरताहेत. पैठणी ही कला असून, ती जपण्यासोबतच ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि दिव्यांग पुनर्वसन यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
पैठणी म्हटली की आजही अनेकजण ‘कापसे पैठणी’चं नाव काढतात. कापसे पैठणी ही एक सक्सेस स्टोरी आहे. अक्षरशः शून्यातून उभं केलेलं ते एक साम्राज्य आहे. बाळकृष्ण कापसे नावाच्या धडपड्या उद्योजकाची ती मन हेलावणारी यशोगाथा आहे. गेली दोन दशकांहून अधिक काळ कापसे समूह पैठणीची निर्मिती आणि विक्री करत आहे. पण तेवढ्यावर न थांबता, आता कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून ‘कापसे पैठणी पार्क’ची निर्मिती होत आहे.
आम्हाला नक्की काय साधायचंय
- कापसे पैठणी पार्क हे पैठणीच्या नजाकतीनं उभारलं जातं असून, त्यात अत्याधुनिक पैठणी उत्पादनापासून विक्रीपर्यंत लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.
- कापसे फाउंडेशनही याच संकुलात असून, तिथं विणकर प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलं आहे. येथे कर्णबधीर आणि आदिवासी मुलंमुली पैठणी विणताहेत.
- या मुलांना फक्त रोजगारच नाही तर निवास, आहार आणि सर्व जीवनावश्यक सुविधा पुरविण्यासाठी याच संकुलात सुसज्ज आणि देखणी वसाहत उभारण्यात आलीय.
- यासोबतच कापसे फाउंडेशन सेंद्रिय पद्धती शेतीचे प्रयोग आणि सेंद्रिय दुग्ध व्यवसायातही आपला ठसा उमटवण्यासाठी 'अहिल्या गोशाळे'चा उपक्रम राबवत आहे.
- पैठणी या राजवस्त्राबद्दल इत्यंभूत माहिती मिळावी आणि त्याची भव्यता कळावी यासाठी लवकरच याच संकुलात 'पैठणी संग्रहायल' आकाराला येणार आहे.
आपली साथ हवीय…
आमच्या या उपक्रमांमध्ये आमच्यासोबत या
अस्सल हातमागावर विणलेल्या पैठणीची कला जिवंत ठेवणं, हे आजचं आव्हान आहे. त्यासाठी त्याचं प्रशिक्षण मिळायला हवं आणि ज्याच्याकडे कला आहे, त्याला रोजगार मिळायला हवा. हे एकट्यादुकट्याचं काम नाही. आम्ही आहोतच, पण आम्हाला तुमचेही मदतीचे हात हवे आहेत.
विणकरांच्या औषधोपचारासाठी खर्च
माणूस म्हटला की आजारी पडणाराच. आमचे विणकरही आजारी पडतात. त्यांच्या औषधांचा, वैद्यकीय तपासण्यांचा आणि प्रसंगी रुग्णालयाचा खर्च मोठा असतो. हा खर्च आपण उचलू शकता.
वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन करा
पर्यावरण रक्षणासाठी आपण आपल्या पार्कमध्ये आणि परिसरात सातत्याने वृक्षारोपण करत असतो. तसेच नुसती झाडं लावून थांबत नाही, तर त्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने संगोपनही करतो.…
प्रशिक्षण केंद्र उभारणीत सहाय्य करा
विणकरांच्या प्रशिक्षणासाठी उत्तम सुविधा असलेल्या प्रशिक्षण केंद्राची गरज असते. त्या केंद्रातील विविध सुविधांचा खर्चही मोठा असतो. त्यात दिव्यांगांसाठी विशेष लक्ष पुरवावे लागते…

आमची उत्पादनं
अस्सल पैठणी हवीय का?
आमच्या कापसे पैठणी संकुलात बनलेली अस्सल पैठणी आपल्याला हवी असेल, तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन, पाहून घेऊ शकताच. पण तुम्हाला येवल्याला येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाइनही खरेदी करू शकता.
आमच्या सोबत काम करायला तुम्हाला आवडत असेल, तर आमच्या फाउंडेशनचे स्वयंसेवक व्हा.
'कापसे समूह' या संकल्पनेचे संस्थापक
अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कापसे यांच्याविषयी…
आज कापसे पैठणी हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. यामागे आहेत ते बाळकृष्ण नामदेव म्हणजे बाळासाहेब कापसे यांचे स्वप्न, अहोरात्र घेतलेले कष्ट आणि सतत काही तरी चांगलं घडवत राहण्याची तळमळ. डोक्यावर साड्यांचं बोचकं घेऊन घरोघरी जाऊन केलेल्या पैठणीविक्रीपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज कोट्यवधीच्या घरात पोहचला आहे. अत्यंत गरिबीतून मोलमजुरी करून घेतलेलं शिक्षण आणि त्यातून पुढे कापसे पैठणी उद्योगाचं उभारलेलं साम्राज्य ही मोठी यशोगाथा आहे. पण आपल्याला जे समाजाकडून भरभरून मिळालं ते समाजाला परतही द्यायला हवं या भावनेतून त्यांनी कापसे फाउंडेशन आणि अहिल्या गोशाळा हे दोन उपक्रम सुरू केले आहेत.
यशोगाथा विणकरांच्याही…
विणकरांच्या आयुष्यात पैठणीनं घडवलेला बदल
कापसे फाउंडेशनचा प्रवास
ही धडपड आहे पैठणीच्या संवंर्धनाची!
कापसे फाउंडेशनच्या कामाला सुरुवात
निधी उभारणीच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य केंद्रे, मोफत गृहप्रकल्प, श्रमिकांना कौशल्य प्रशिक्षण, स्वच्छता आदी कार्य.
कोरोना साथरोगाच्या काळात १०० टन धान्याचे वाटप आणि दररोज ६०० जणांना १०० दिवस मोफत भोजन.
दोन गावांमध्ये २०० स्वच्छतागृहे बांधली. त्यामुळे ही गावे उघड्यावरील शौचमुक्त झाली. -आरोग्यविषयक आणि शैक्षणिक जाणीवा रुंदावण्यासाठी शिबिरांचे आयोजन.
येवला परिसरात वृक्षारोपण.
गृहनिर्माण कायदा, १८६० अंतर्गत एका विश्वस्त संस्थेची स्थापना.
गृहनिर्माण कायदा, १८६० अंतर्गत एका विश्वस्त संस्थेची स्थापना.
स्थानिक नागरिकांसाठी आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम. ‘कापसे पैठणी पार्क’चे नियोजन.
स्थानिक नागरिकांसाठी आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम. ‘कापसे पैठणी पार्क’चे नियोजन.
कापसे पैठणी संकुलाची निर्मिती
आदिवासी बेरोजगार, दिव्यांग, अनाथ, महिलांसाठी प्रशिक्षणकेंद्र सुरू
त्यांच्यासाठी निवासी व्यवस्था आणि आहारगृह सक्रीय
शेततळं, अहिल्या गोशाळा कार्यरत त्याअंतर्गत पैठणी संग्रहायलाचं काम वेगात सुरू