कापसे समूहाचे सामाजिक काम
कापसे समूहाचे सामाजिक काम
पैठणीच्या पलिकडला समाज'कर्मयोग'
कापसे फाउंडेशन हे फक्त पैठणी आणि पैठणीच्या विणकरांपुरते मर्यादीत राहिले नसून त्यांनी येवला आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सामाजिक कामांना हातभार लावला आहे. आपलं काम हे फक्त वैयक्तिक स्वार्थ नव्हे तर समाजाला डोळ्यासमोर ठेवूनच करायला हवं, या वचनावर कापसे समूहाची श्रद्धा आहे. त्यामुळे आजवर कापसे समूहाने जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा आपला हात आणि प्रयत्न कमी पडू दिले नाहीत.
शिक्षण
- २०१३ पासून कापसे प्रतिष्ठान येवला आणि परिसरात अनेकविध शैक्षणिक सुविधा विकसित करण्यासाठी पुढाकार घेत आहे.
- होतकरू युवक, युवती, अनाथ, आदिवासी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणासाठी अनुदान; तसेच आर्थिक साह्य सातत्याने देण्यात येत आहे.
- येवला आणि परिसरातील अनेक शाळांमध्ये डिजिटल साक्षरतेच्या दृष्टीने अनेक शाळांना संगणक खरेदीसाठी; तसेच संगणक प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी सातत्याने मदत केली जात आहे.
- अनेक विद्यार्थ्यांना स्टेशनरी, शालेय गणवेश, पुस्तके आदीचे वितरण केले जात आहे. प्रतिष्ठानतर्फे स्थानिक युवकांसाठी व्यक्तिमत्व विकासाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
- संगणक साक्षरतेसाठी शिबिरे आयोजित केली जातात. विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
- शाळांमध्ये सुविधांची कमतरता असेल, तर त्यांना बसण्याचे बाक, प्रोजेक्टर (प्रक्षेपण यंत्र), आदी उपलब्ध करून देण्यासाठी कापसे फाउंडेशनकडून कायम पुढाकार घेण्यात येतो.
- शाळांमधील सुरक्षितता आणि देखरेखीसाठी सीसीटीव्ही कँमेरा यंत्रणा बसवून दिली जात आहे.
आरोग्य
- येवला परिसरातील अनेक खेड्यांमध्ये कापसे प्रतिष्ठानच्या वतीने आजवर अनेक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत.
- आरोग्यविषयक प्रबोधन, व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन, आदिवासी भागातील कुपोषित बालकांना सकस आहारासाठी त्यांच्या पालकांचे प्रबोधन, असे विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.
- औषधांचे वितरण, रक्तदान, आजार निदान चाचण्या अशा विविध आरोग्यविषयक मोहिमांचे आयोजन सातत्याने केले जाते.
स्वच्छतागृहे
- स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, या दृष्टीने शाळांमधील नळांना; तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नळांना फिल्टर्स बसविण्याचे काम केले गेले आहे.
- प्रत्येक घरी स्वच्छतागृह बांधले जावे, या उद्देशाने अनेक ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रमही आयोजित केले गेले आहेत.
कोविडकाळात मदत
- कोविडची महामारी माणसाला माणसापासून दूर ठेवत असताना कापसे समूहाने समाजातील अनेक गरजूंना धान्यवाटप केले.
- कोरोनाच्या बिकटकाळात रेमडेसिव्हरचे इंजेक्शन मिळत नव्हते, तेव्हा ज्याला तातडीची गरज आहे, त्याला या इंजेक्शनच्या वितरणाची व्यवस्था केली.
- रुग्णालयात असलेल्या कोविड रुग्णांना गरजेनुसार जेवणाचे डबे पुरविले.