पैठणी विणण्याची कला
महाराष्ट्रातील हातमाग उद्योग
महाराष्ट्रातील हातमाग उद्योग हा विकेंद्रित आहे. राज्यातील काही भागांतच तो एकवटलेला आहे. चौथ्या अखिल भारतीय हातमाग जनगणनेनुसार, सध्या महाराष्ट्रात ३,४३५ विणकर कुटुंबे आहेत. त्यांतील २४४५ कुटुंबे शहरी भागात राहतात, तर ९९० कुटुंबे ग्रामीण भागात वास्तव्य करतात. हातमाग क्षेत्रात प्रादेशिक वैशिष्ट्ये दिसून येतात. त्या त्या भागानुसार उत्पादनांना नावे दिली जातात. उदा. नागपुरी साड्या, पैठणी साड्या, मेहेंदर्गी चोली खान आदी.
विणकामासाठी लागणारे उच्च कौशल्य व कच्च्या मालाची कमतरता, अल्प भांडवल आणि सरकारी पाठबळाअभावी महाराष्ट्रातील हातमाग उद्योगाने आपले सामर्थ्य गमावले आहे. तंत्रज्ञानाची प्रगती, विकेंद्रीकरण, विपणनातील दुव्यांची कमतरता या बाबतीत सुधारणा करण्यास अद्याप वाव आहे. चौथ्या हातमाग जनगणनेनुसार, सध्या महाराष्ट्रात ३,४३५ विणकर कुटुंबे असून त्यांपैकी २,४४५ शहरी भागात आणि ९९० कुटुंबे ग्रामीण भागात वास्तव्य करतात.
इतिहास पैठणीचा
पैठणी विणण्याची कला ही दोन हजार वर्षे जुनी आहे. या कलेचा जन्म पैठणमध्ये म्हणजे तत्कालीन प्रतिष्ठानमध्ये झाला. पैठण शहर हे औरंगाबादपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. हे शहर पूर्वी रेशीम आणि जरीचे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून गणले जात असे. सातवाहन काळात पैठणमधील व्यापर आणि वाणिज्य क्षेत्राला झळाळी आली. त्या वेळी मलमलचे कापड हे वैशिष्ट्य होते.
पैठणी निर्मिती प्रक्रियेवर दृष्टिक्षेप
आज आपण नक्षीदार मोराची पैठणी पाहतो, ती विविध प्रक्रियांमधून साकारलेली कलाकृती असते. पैठणी विणण्याची प्रक्रिया काही स्वतंत्र मात्र, एकमेकांशी जोडलेल्या टप्प्यांमध्ये केली जाते. या टप्प्यांचा आपण प्राधान्यक्रमाने आढावा घेऊयात.
- क्रमवारी लावणे, गुंडाळणे आणि फिरवणे
हातमागावर कापडाला एक प्रकारचा ताण दिला जातो, हा ताण पेलण्यासाठी आवश्यक ताकद निर्माण व्हावी, या उद्देशाने कच्च्या रेशमावर तीन टप्प्यांमध्ये प्रक्रिया केली जाते. हे तीन टप्पे म्हणजे, क्रमवारी लावणे, गुंडाळणे आणि फिरवणे. रेशीम विणताना ताण्याची वीण अधिक घट्ट असावी लागते. ही वीण आधार देण्याचे काम करते आणि ती हातमागाचा ताण पेलत असते. या प्रक्रियेत कच्चे रेशीम बाण्याच्या विणीत परावर्तित होते.
- ब्लीचिंग, रंग देणे आणि आकार देणे
गुंडाळलेले आणि फिरवलेले रेशीम रंगाऱ्यांकडे पाठवले जाते. विरंजनाचे काम सोडियम कार्बोनेटच्या उकळत्या द्रावणात बुडवून केले जाते. या प्रक्रियेमुळे रेशीम पांढरे होते आणि त्यातील अशुद्धताही नष्ट होते. हवे ते रंग प्राप्त करण्यासाठी रंग गरम पाण्यात मिसळले जातात. रंग देण्याच्या कामात सामान्यतः रेशमाचे कापड विसविशीत होते. कापडाची ताकद कायम ठेवण्यासाठी आणि विणण्यासाठी धागा सशक्त राहाण्यासाठी रेशमाचे अरारुट खळ, साखर, डिंक आणि मध यांच्यासमवेत सायझिंग करतात.
- सोन्याचे आणि चांदीचे धागे (थ्रेडिंग)
या प्रक्रियेत नक्षीकामानुसार विणकर जरीच्या आणि अन्य रंगांच्या धाग्याचे विणकाम करतात. हातमागाला जॉबी नावाचे एक यंत्र बसविण्यात येते. त्यामुळे हातमागाच्या हालचालीला गती मिळते. त्याचा साडीच्या काठाचे नक्षीकाम करण्यासाठी उपयोग होतो. एखाद्या साडीवर खूप नक्षीकाम असेल, तर विणण्याची प्रक्रिया अधिक कठीण होते. त्यामुळे त्या प्रमाणात साडीही तितकीच महागडी होते.
- नक्षीकाम
साडीचे विणकाम पूर्ण झाल्यावर ती हातमागावरून बाहेर काढली जाते आणि आकारात कापण्यासाठी पाठवली जाते. नक्षीकामामुळे ब्रोकेड अत्यंत आकर्षक दिसते. नक्षीकाम करताना बाण्याचे धागे कसे विणले जातात, त्यावर पैठणी विणकराचे वैशिष्ट्य अवलंबून असते. या कामात नक्षीतील प्रत्येक वेगळ्या रंगासाठी बांबूची स्वतंत्र आस वापरली जाते. नकाश अथवा तालिमसारख्या एखाद्या वस्तूचा वापर नक्षीसाठी करण्याऐवजी नक्षीच्या गुंतागुंतीनुसार विणकर धाग्यांची वीण घालत असतात. त्यासाठी ते बाण्याच्या धाग्याचा वापर करतात.
- पैठणी साडी
या प्रक्रियेत नक्षीकामानुसार विणकर जरीच्या आणि अन्य रंगांच्या धाग्याचे विणकाम करतात. हातमागाला जॉबी नावाचे एक यंत्र बसविण्यात येते. त्यामुळे हातमागाच्या हालचालीला गती मिळते. त्याचा साडीच्या काठाचे नक्षीकाम करण्यासाठी उपयोग होतो. एखाद्या साडीवर खूप नक्षीकाम असेल, तर विणण्याची प्रक्रिया अधिक कठीण होते. त्यामुळे त्या प्रमाणात साडीही तितकीच महागडी होते.
पैठणीचं हे वैभव आज जरी सर्वपरिचित असलं, तरी ते अस्सल आहे की नाही, हे कसं ओळखायचं हा आज मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आज यंत्रमागावर विणलेल्या पैठणीही लोकप्रिय आहेत. काळापुढे कुणाचं काहीच चालत नसलं, तरीही हातमागावर विणलेल्या अस्सल रेेशमी पैठणीची शान काही न्यारीच आहे. त्यामुळेच या पैठणीविषयीच जनजागृती व्हावी आणि चोखंदळ रसिकांच्या शंका फिटाव्या यासाठी कापसे समूह कटिबद्ध आहे. शेवटी अस्सल ते अस्सलच!
पैठणी विणण्याच्या कलेचे संवर्धन
वारसा भरजरी परंपरेचा जपायला हवा
पैठणी विणणारे कारागीर आणि त्यांची कला हळूहळू लयाला जात आहे. किंबहुना केवळ काही कारागीर ही कला अद्याप टिकवून आहेत. या कलेचे पुनरूज्जीवन करीत तिला पुन्हा वैभवाचा काळ यावा, यासाठी तातडीने नियोजन आणि कृती करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील पैठणी विणण्याची कला प्राचिन आणि दुर्मिळ स्वरूपाची आहे. एवढेच नव्हे, तर अद्वितीय कारागिरीचे प्रतिबिंब आहे. हातमागावर हातांची कलाकारी दाखवित विणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील पैठणीला यंत्रमागांवर तयार होणाऱ्या पैठणीशी अतोनात स्पर्धा करावी लागत आहे. कित्येक शतके सुवर्ण जरीचा वापर करीत विणली जाणारी पैठणी हा नववधूच्या शृंगाराचा अविभाज्य घटक आहे. कापसे पैठणी पार्कमध्ये हातमागावर विणल्या जाणाऱ्या अप्रतिम कारागिरीचा नमुना असलेली पैठणीची कला टिकवणे आणि वृद्धींगत करणे, हे कापसे पैठणी पार्कचे उद्दिष्ट आहे. या पार्कमध्येच पैठणी संग्रहालयही उभारण्यात येईल. हे संग्रहालय पैठणीची अद्भूत कला आणि इतिहासाचा वेध घेणारे असेल.
आम्ही काय करतो आहोत?
पैठणीची सौंदर्य आणि वैभव वृद्धिंगत व्हाव यासाठी कापसे पैठणी संकुलाची उभारणी जोरात सुरू आहे. यात पैठणी घ्यायला येणाऱ्या नवरीपासून सेलिब्रिटीपर्यंत आणि कुटुंबापासून लग्नाच्या व्हराडापर्यंत सर्वांची सोय व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. येथे येणारे पैठणीच्या संवर्धनाचं कामही पाहतील आणि आवडली तर पैठणीची खरेदीही करतील.
- एकात्मिक संकुल उभारणं
आज पैठणीसाठी लागणारा कच्चा माल, विणण्याआधीची आणि नंतरची प्रक्रिया, किरकोळ आणि घाऊक विक्रीसाठीचे ठिकाण हे एकाच जागी उपलब्ध नाहीत. या सर्व घटकांचा विचार करून हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक संकुल विकसित करणे.
- पैठणीसाठी सबकुछ
पैठणी संकुलात २००० हातमाग असतील. शिवाय ९० हजार चौरस फुटांचे विक्रीदालनही प्रस्तावित आहे. तसेच पैठणी साठवणूक सुविधा, रंगकाम केंद्र व येथे काम करणाऱ्यां विणकरांसाठी निवासाची व्यवस्था असेल.
- लग्नाच्या बस्त्यासाठी सोय
लग्नासाठी बस्ता बांधण्याची परंपरा आहे. या बस्त्यासाठी एकाच कुटुंबातील अनेक जण सहभागी असतात. बस्ता बांधण्यासाठी येणाऱ्यांना स्वतंत्र प्रशस्त खोल्यांचीही सुविधा असेल. तेथे ते निवांतपणे खरेदी करू शकतील.
- भेट देणाऱ्यांसाी खास व्यवस्था
पैठणी पार्कला भेट देण्यासाठी येणाऱ्या ग्राहक आणि अभ्यागतांसाठी उपहारगृहाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा २०२१ मध्ये आकाराला येईल. या उपहारगृहात १०० जणांच्या बसण्याची सोय असेल.
- रेशीम उत्पादनाचं नियोजन
पैठणीसाठी लागणाऱ्या रेशमी कापड्याच्या निर्मितीसाठी अस्सल रेशीम उपलब्ध व्हावे, म्हणून भावी काळात रेशमाचे उत्पादन करण्यासाठीचेही नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी अभ्यास सुरू असून, तज्ज्ञांची पाहणी करण्यात आली आहे.
पैठणीचे प्रकार
पैठणी म्हटलं की डोळ्यापुढे मोर येत असला, तरी या पैठणीचे विविध प्रकार आहेत. या विविध प्रकारांना विणण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारे कष्टही वेगवेगळे असतात. या सगळ्यात विणकराच्या कौशल्याचा आणि चिकाटीचा कस लागतो. ही प्रक्रिया शेवटी एका नितांतसुंदर कलाकृतीत साकारत असते. या पैठणीचे सर्वसाधारण प्रकार पुढीलप्रमाणे…
बांगडी मोर पैठणी
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, ही पैठणीची ओळख बनली आहे. याला विणकरांच्या भाषेत बांगडी मोर म्हणतात. बांगडी मोर म्हणजे बांगडीच्या आकारात विणलेला मोर. असा मोर साधारणतः साडीच्या पदरावर विणला जातो. पैठणी साडीचे हे सर्वाधिक वापरले जाणारे नक्षीकाम आहे.
एकधोटी पैठणी
एकधोटी प्रकारातील साडीचे बाण्याचे धागे विणण्यासाठी एकाच धोट्याचा वापर केला जातो. ताणाच्या धाग्यांचा रंग आणि बाण्याच्या धाग्यांचा रंग दोन्ही वेगळे असतात. या साड्यांना नारळी किनार असते आणि साडीवर साधी बुट्टीची नक्षी असते. ही बुट्टी नाण्यांच्या आकाराची किंवा मटारदाण्यांच्या आकाराची असू शकते.
पारंपरिक पैठणी
पैठणी साड्यांचा रंग कोणताही असला, तरी त्या खूपच खुलून दिसतात. पण या पैठणीत प्रामुख्याने तीन रंग दिसून येतात. काळी चंद्रकला (लाल काठ असलेली काळ्या रंगाची साडी), राघू (पोपटासारखी हिरवीगार) आणि शिरोदक (शुभ्र). या पारंपरिक रंगाच्या पैठणींना सर्वाधिक मागणी असते.