आमचे विणकर
पैठणीनं बदललं विणकरांचं आयुष्य
- तरुणाला रोजगार, देशाला आधार : ज्या समाजातील तरुणाच्या हाताला रोजगार असेल, तरच तो समाज आर्थिक, सामाजिक विकास करू शकतो. आम्ही पैठणी उत्पादनातून २१ ते ४० या वयोगटातील सुमारे ६८ टक्के तरुण विणकरांना रोजगार दिला आहे.
- शेवटच्या पायरीवर असलेल्या प्राधान्य : आमच्याकडे काम करणाऱ्या विणकरांपैकी सुमारे ३४ टक्के विणकर तरुण हे शेतकरी कुटुंबातील आणि २४ तरुण आदिवासी गटातील आहेत, तर एकूण ६० टक्के विणकर हे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गातील आहेत.
- शिक्षणापासून दूर राहिलेल्यांना पर्याय : औपचारिक शिक्षणापासून दूर राहिलेल्यांसाठी पैठणी उत्पादन हे रोजगाराचे साधन बनू शकते. आमच्याकडील ७४ टक्के विणकर जेमतेम दहावी-बारावीच्या पलिकडे शिकेलेले नाहीत. तरीही त्यातील सुमारे ८० टक्के जण दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमावतात.
- रोजगारासोबत सामाजिक सुरक्षाही : कापसे समूहाशी जोडलेल्या बहुतांश विणकरांकडे आज स्वतःचा हातमाग आहे. त्या हातमागावर उपलब्ध झालेल्या रोजगारासोबत कौशल्य विकास, जीवन विम्याचे सुरक्षाकवच आणि निवाऱ्याची उत्तम व्यवस्था उपलब्ध झाली आहे.
आजची परिस्थिती
पैठणी उद्योगात विणकर कुठाय?
पैठणी उत्पादन हे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देणारे आणि त्यांना उदरनिर्वाहाचे साधन मिळवून देणारे एक प्रमुख क्षेत्र आहे. परंतु या क्षेत्रात आर्थिक प्राप्ती अत्यंत कमी आहे. तसेच इथे रोजगाराचीही श्वाश्वती नसल्याने ग्रामीण भागात असलेले बहुतांश विणकर प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आहेत.
रोजगाराची हमी नाही
भारतीय हातमाग क्षेत्रामध्ये सध्या ३१ लाख कुटुंबे हातमाग व त्यासंबंधीची कामे करीत आहेत. पण त्यातील अनेकांना रोजगाराची हमी नाही.
कौशल्याचा, निधीचा अभाव
महाराष्ट्रातील हातमाग उद्योगात कुशल कामगारांची कमतरता आणि निधीचा अभाव आहे. त्यामुळे या उद्योगाची स्थिती दयनीय झाली आहे.
पारंपरिक कला मरणोन्मुख
हातमागावर विणलेली पैठणी ही महाराष्ट्राची शान आहे. पण आज अशी पारंपरिक पद्धतीने पैठणी विणण्याची कला मरणोन्मुख झाली आहे.
पैठणी बनते महाराष्ट्राबाहेर
महराष्ट्रात पैठणी उद्योगात असलेल्या अनेक अडचणींमुळे आज देशातील सुमारे ८५ टक्के पैठणी उत्पादन आणि विक्री महाराष्ट्राबाहेर होते आहे.
पैठणी बनते यंत्रमागावर
आज बाजारातील बहुतांश पैठण्या यंत्रमागावर विणलेल्या आहेत. म्हणूनच हातमागावरील महाराष्ट्राची पारंपरिक पैठणी जपण्यासाठी कापसे समूह प्रयत्नरत आहे.
दिव्यांग, मूकबधीर व्यक्तींना सन्मानाचं काम
दिव्यांगांनी साकारलेली दिव्य कलाकृती
परमेश्वराने ज्यांच्या कानात सूर ऐकण्याची क्षमता दिली नाही, त्यांच्या हातात त्या विधात्यानं कलाकृती साकारण्याची कला दिली आहे. त्या कलेची जाण ठेवली तर तिच त्या परमेश्वराची मांडलेली सर्वोत्तम पूजा होय. यासाठीच आम्ही कापसे समूहामध्ये समाजात उपेक्षा अनुभवायला लागणाऱ्या दिव्यांगांना सन्मानाचे स्थान देतो. आज आमच्याकडे काम करणाऱ्या दिव्यांगांना मानानं काम करून आपलं पोट भरता येतं.
- पैठणी विणण्यासाठी दिव्यांगांना प्राधान्य
पैठणी विणणं हे तसं कष्टाचं आणि ध्यानाचं काम आहे. दिव्यांगबंधूंकडे एखाद्या गोष्टीत ध्यान लावून काम करण्याची क्षमता ही असामान्य असते. तसेच आपल्या कानावर पडणाऱ्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी त्यांना त्रास देत नाहीत. त्यामुळे हे दिव्यांग पैठणी निर्मितीतून उत्तम कलाकृती साकारत असून स्वतःच्या उत्तम रोजगाराची संधी उभी करत आहेत.
- दिव्यांगांसाठी निवारा, आहार आणि सुरक्षा
आमच्याकडे काम करणारा दिव्यांग हा आमच्या समूहाचा खास सदस्य आहे. घरातील व्यक्तीप्रमाणे त्याची काळजी आमच्यातील प्रत्येकजण इथं घेतो. आज अशा दिव्यांगामधील गरजूंना मोफत किंवा माफक दरात राहण्याची उत्तम व्यवस्था पैठणी संकुलामध्येच उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या आहारासाठी भोजनालय असून सामाजिक सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आलीय.
सामाजिक प्रश्न आहेत आणि असणार. पण, त्यातून मार्ग शोधलेच पाहिजेत!
प्रश्न पैठणीसंदर्भातले, उत्तरे कापसे समूहाची
आज पैठणी उद्योग आणि एकंदरीत समाजातील रोजगार, अर्थव्यवस्था अशासंदर्भातील अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. या प्रश्नांकडे पाहत हातावर हात ठेवून स्वस्थ बसणे आम्हाला मान्य नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहायला हवे, असे आमचे धोरण आहे. त्यानुसार आम्ही पुढील चार तत्वांच्या आधारे काम करण्यास सुरुवात केली आहे.
- पैठणी विणण्याच्या कला वारशाचे जतन
आज यांत्रिकीकरणाच्या जगात हातमागावर पैठणी विणण्याची कला जिवंत ठेवणे हे आव्हान आहे. पण अस्सल पैठणीचा साज हा हातमागावरच साकारतो. त्यामुळे ही कला जिवंत ठेवण्यासाठी कापसे समूह प्रशिक्षण, उत्पादन आणि संवर्धन यातून हा वारसा जपेल.
- पैठणी उत्पादनासाठी एकात्मिक संकुल
पैठणीच्या धाग्यापासून त्याच्या विक्रीपर्यंत आणि जुन्या पैठणींच्या संग्रहालयापासून नव्या पैठणींच्या संशोधनापर्यंत सारे काही एकत्र अनुभवता यावे यासाठी कापसे पैठणी संकुल साकारत आहे. यात पैठणीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व गरजा एकत्र पूर्ण होतील.
- स्थानिक रोजगार निर्मिती
आपल्या घराजवळ काम मिळणे हे कोणासाठी आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे. कापसे समूहाला याचे भान असून, ते येवले आणि तेथील आसपासच्या गावातील विणकरांना संकुलामध्ये किंवा त्यांच्या घरातच पैठणी उत्पादनाची संधी उपलब्ध करून देत आहे.
- दिव्यांगांना, आदिवासींना विशेष मान
रोजगारनिर्मिती आणि पैठणी उद्योग यांची अभिनव सांगड घालण्यासाठी कापसे पैठणी समूहाने यात दिव्यांगांसाठी मानाचं पान लिहिलं आहे. कानाने ऐकू न येणाऱ्या अनेक दिव्यांगांना आणि आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या तरुणतरुणींना इथं रोजगार मिळावा यासाठी विशेष प्राधान्य आहे.
प्रशिक्षण सुविधा आणि निवास
विणकरांनी विणलेला स्वतःचा खोपा
- पैठणी विणण्याचे कौशल्य प्राप्त करता यावे यासाठी कापसे संकुलात प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. तिथे नवीन येणाऱ्या विणकराला प्रशिक्षण मिळते. त्यासाठी त्याला कोणतीही फी भरावी लागत नाही. उलट त्याची काळजी कापसे समूह घेतो.
- आजपर्यंत कापसे समूहात …………… पेक्षा अधिक विणकरांनी अक्षरशः शून्यापासून सुरुवात करून प्रशिक्षण घेतले आहे. आज ते कुशल पैठणी विणकर म्हणून काम करत आहेत. त्यातील अनेकजण आज दरमहा १० हजाराहून अधिक उत्पन्न मिळवित आहेत.
- कापसे समूहाच्या योजनेनुसार पुढील सात वर्षांत सुमारे १४,४०० विणकरांना प्रशिक्षण आणि रोजगार देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात कापसे पैठणी पार्कची क्षमता वाढवून ८,४०० विणकरांना तर दुसऱ्या टप्प्यात येवला परिसरात घरोघरी जाऊन पुढील ५००० विणकरांना प्रशिक्षण दिले जाईल.
- या विणकरांसाठी उत्तम आणि हवेशील अशी वसाहत बांधण्यात आली असून आज तिथे……………. हून अधिक विणकर राहत आहेत. तसेच त्यातील अनेकांना स्वतःच घर उभारले आहे. हाताला काम मिळाले की माणूस नव्या स्वप्नांना आकार देतो, हे यातून सिद्ध झाले आहे.