कापसे पैठणी पार्क
प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट्ये
पैठणी संकुलातून साध्य काय करायचंय?
स्थानिक रोजगारात वृद्धी, पैठणी विणण्याच्या कलेचे संवर्धन करणे, कच्च्या मालापासून पैठणी विणणे आणि सर्वोत्तम पैठण्या उपलब्ध करून देणे, ही कापसे समूहाची उद्दिष्टे आहेत.
- पैठणी विणण्याच्या कलेचे आणि संस्कृतीचे संवर्धन
पैठणी विणणारे कारागीर आणि त्यांची कला हळूहळू लयाला जात आहे. किंबहुना केवळ काही कारागीर ही कला अद्याप टिकवून आहेत. या कलेचे पुनरूज्जीवन करीत तिला पुन्हा वैभवाचा काळ यावा, यासाठी तातडीने नियोजन आणि कृती करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील पैठणी विणण्याची कला प्राचिन आणि दुर्मिळ स्वरूपाची आहे. एवढेच नव्हे, तर अद्वितीय कारागिरीचे प्रतिबिंब आहे. हातमागावर हातांची कलाकारी दाखवित विणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील पैठणीला यंत्रमागांवर तयार होणाऱ्या पैठणीशी अतोनात स्पर्धा करावी लागत आहे. कित्येक शतके सुवर्ण जरीचा वापर करीत विणली जाणारी पैठणी हा नववधूच्या शृंगाराचा अविभाज्य घटक आहे. कापसे पैठणी पार्कमध्ये हातमागावर विणल्या जाणाऱ्या अप्रतिम कारागिरीचा नमुना असलेली पैठणीची कला टिकवणे आणि वृद्धींगत करणे, हे कापसे पठणी पार्कचे उद्दिष्ट आहे. या पार्कमध्येच पैठणी संग्रहालयही उभारण्यात येईल.
- पैठणी उत्पादनासाठी एकात्मिक संकुल
पैठणी कापडाच्या निर्मितीसाठी पैठणी विक्री करणारे व्यापारी आणि विक्रेते यांची पुरवठा साखळी मर्यादित स्वरूपात आहे. पैठणीसाठी लागणारा कच्चा माल, विणण्याआधीची आणि नंतरची प्रक्रिया, किरकोळ आणि घाऊक विक्रीसाठीचे ठिकाण हे एकाच जागी उपलब्ध नाहीत. या सर्व घटकांचा विचार करून हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक संकुल विकसित करण्याचे कापसे पैठणी पार्कची योजना आहे. यामुळे पैठणीचे उत्पादनही वाढेल आणि त्याची किंमत नियंत्रित होण्यास मदत होईल. या पार्कमध्ये २००० हातमाग असतील. शिवाय ९० हजार चौरस फुटांचे विक्रीदालनही प्रस्तावित आहे. साठवणूक सुविधा, रंगकाम केंद्र व येथे काम करणाऱ्यांसाठी मनुष्यबळासाठी निवासाची व्यवस्था असेल आणि भावी काळात रेशमाचे उत्पादन करण्यासाठीचेही नियोजन करण्यात आलेले आहे.
- स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती
हातमाग उद्योगाची रोजगारनिर्मिती क्षमता प्रचंड आहे. येवला आणि आसपासच्या तालुक्यातील मोठी लोकसंख्या ही चांगले राहणीमान आणि रोजगाराच्या शोधात आहे. पैठणी विणण्याचे कौशल्य प्रशिक्षण दिल्यास आणि ही कला त्यांनी आत्मसात केल्यास या परिसरातील १५ ते २० हजार जणांना रोजगार देण्याची क्षमता या उद्योगात आहे. ही रोजगार निर्मिती झाल्यास बेरोजगारीमुळे उद्भवणाऱ्या अनेक सामाजिक समस्याही दूर होतील. त्या दृष्टीने कापसे पैठणी पार्कमधील प्रकल्प अनेकपटींनी वाढवण्याचे नियोजन आहे. कापसे पैठणी पार्कमध्ये पाच हजार जणांना रोजगार उपलब्ध होउ शकतो, तर कापसे पैठणी उद्योगाशी निगडित पुरवठादारांच्या रूपाने आणखी रोजगार निर्मितीही होऊ शकते.
कापसे पैठणी संकुल (पार्क)
कापसे पैठणी संकुल (पार्क)
येवला गावाच्या बाहेर असलेल्या वडगाव येथील ५७ एकरपेक्षाही अधिक जमिनीवर कापसे पैठणी पार्कची (पार्क) स्थापना करण्यात आली आहे. पैठणी आणि अन्य उत्पादनांच्या विक्रीचे हे समृद्ध केंद्र बनले आङे. एवढेच नव्हे, तर ग्राहक येथे एखाद्या छोट्या सहलीसाठीही येत असतात. पैठणी विकणे हे व्यावसायिक उद्दिष्ट ठेवण्यात आले असले, तरीही त्याला सामाजिक बाजूही आहे.
इतिहासाचे दर्शन आणि पैठणी विणण्याच्या कलेचे प्रदर्शन करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे. या केंद्रामध्ये प्रदर्शन भरवले जाईल आणि या प्राचीन कलेची माहिती येणाऱ्यांना व्हावी, या उद्दिष्टाने येथे एक विभागही उभारण्यात येईल. या प्रकल्पाचे काम अद्याप सुरू असून कापसे समूहाचे हे स्वप्न साकार होण्याकडे जलदगतीने वाटचाल सुरू आहे.
पैठणी कापडाच्या विणकामाची प्रक्रिया जतन करणे आणि ती पुन्हा तिच्या मूळाकडे परत नेणे या दोन्ही बाबतीत के के हँडलूम समूहाला यश आले आहे. या संबंधातील काम करणारे तज्ज्ञ आणि या कलेचे आगळेपण पाहता ते पाठणी पार्कसाठी पोषकच ठरेल. हा शाश्वत प्रकल्प उत्कृष्टतेचे केंद्र बनण्याचे उद्दिष्टही साध्य करील.
पैठणीच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंत सबकुछ
‘पैठणी संकुला’ तील प्रमुख प्रकल्प
विक्रीदालन आणि संग्रहालय
एकूण विणकरांची क्षमता
वार्षिक विणकरांना प्रशिक्षण
प्रशिक्षण सुविधेसाठी खर्च
प्रशिक्षण उपक्रम खर्च
प्रशिक्षण केंद्र
विणकामासाठी आणि अन्य कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी कापसे फाउंडेशनने अनेक सामंजस्य करार केले आहेत. या अंतर्गत एकाच वेळी १०० जणांच्या गटाला विणकाम कौशल्य प्रशिक्षण देता येईल. वर्षभरात ४०० जणांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षण कालावधी सहा महिन्यांचा असेल आणि दररोज चार तास प्रशिक्षण दिले जाईल. रोज दोन गटांना आणि वर्षात चार गटांमधून ४०० जणांना विणकाम कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करता येईल.
प्रशिक्षणासाठी वर्गखोली आणि १०० हातमाग यंत्रासह अन्य उपकरणे आणि कच्चा माल उपलब्ध करून द्यावा लागेल. कौशल्य विकसित होण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक प्रशिक्षणावरही भर दिला जाईल. एका गटासाठी सात प्रशिक्षक आणि तीन जणांचा सहाय्यक कर्मचारी वर्ग असेल. प्रशिक्षण केंद्रासाठी भांडवली खर्च आणि दैनंदिन खर्चाची तरतूद करण्यात येत आहे. वर्गखोल्या व हातमाग यंत्रांसाठी भांडवली गुंतवणूक लागणार आहे. त्यासाठी साधारणतः साडेतीन कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाईल. प्रशिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन, कच्चा माल आणि देखभाल या नियमित खर्चासाठी एका गटासाठी १ कोटी २० लाख रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे. विणकर प्रशिक्षण वर्गखोल्यांमध्ये होणार असून प्रत्यक्ष कार्यानुभव हातमाग यंत्रांच्या माध्यमातून देण्यात येईल.
वर्गातील प्रशिक्षण : हातमाग प्रशिक्षण (१०० तास) अधिक कच्चा माल प्रशिक्षण (५० तास)
व्यावहारिक प्रशिक्षण : मागाची सर्व माहिती व चालवण्याची माहिती (२०० तास) अधिक विणकामाचे मुलभूत तंत्र आत्मसात करणे (१५० तास)
उत्पादन कक्ष
उत्पादन विभागाच्या उभारणीस २०१६ मध्ये प्रारंभ झाला. या विभागात सध्या तीन मजल्यांवर ३९ हजार चौरसफूट जागा विकसित झाली आहे. भविष्यकाळात आणखी चार मजले वाढविण्याची सोयही आहे. विकसित झालेल्या तीन मजल्यांवरील प्रत्येक मजल्यावर ८० हातमाग यंत्रे सामावू शकतात. सध्या पहिल्या मजल्यावर ८० हातमाग यंत्रे कार्यान्वित आहेत आणि आणि ८० हातमाग यंत्रे दुसऱ्या मजल्यावर बसविण्यात आली आहेत. सध्या असलेले माग पैठणीचे कापड उत्पादित करण्यासाठी वापरले जात आहे. अन्य मजल्यांवरील हातमाग सुती आणि खादी कापड उत्पादनासाठी वापरले जातील.
या विभागातच नक्षीकाम विभागही असेल. या विभागामार्फत विणकर कारागिरांना नक्षीकामासाठी रचना (डिझाइन) पुरवल्या जातात. दिलेला रंग वाळल्यानंतर पैठणीचे कापड मागावर चढवून नक्षीकामाचे आकृतीबंध तयार करण्यासाठीची व्यवस्थाही येथेच होते.
कर्मचारी वसाहत
आर्थिकदृष्ट्या कमकुवत कामगारांसाठी आणि विणकरांसाठी कापसे प्रतिष्ठानच्या वतीने कर्मचारी वसाहत उभारण्यात येत आहे. सध्या चार इमारती तयार झालेल्या असून तेथे एकूण ७१ सदनिका तयार आहेत. ६०० चौरसफूटांच्या या सदनिकांमध्ये सध्या ३३ कुटुंबे वास्तव्यास आहेत.
आदिवासी आणि मूकबधीर व कर्णबधीर दिव्यांग विणकरांना प्रतिष्ठानच्या वतीने मोफत निवास व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या अन्य कुटुंबांकडून १२०० रुपये देखभाल खर्च घेतला जातो. याच परिसरात आणखी ९ इमारती विकसित करण्याचे नियोजन आहे. १२०० चौरस फुटांच्या ३६ सदनिका येथे बांधण्यात येणार आहेत. हे काम २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पैठणी पार्कमधील विणकरांव्यतिरिक्त कार्यालयीन कामकाज करणाऱ्यांसाठी या सदनिका तयार करण्यात येत आहेत.
आदिवासी आणि मूकबधीर व कर्णबधीर दिव्यांगांना विणकामाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आणखी अपार्टमेंट उभारण्याचे प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे. यासाठी आणखी १५ एकर जमीन पार्कच्या परिसरात उपलब्ध आहे.
पाहुण्यांसाठी सुविधा
पैठणी पार्कला भेट देण्यासाठी येणाऱ्या ग्राहक आणि अभ्यागतांसाठी उपहारगृहाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा २०२१ मध्ये आकाराला येईल. या उपहारगृहात १०० जणांच्या बसण्याची सोय असेल. अभ्यागतांच्या आरामासाठी अभ्यागत कक्षही असेल. त्याचबरोबर इमारतीत विचारविनिमय कक्षही असेल.
लग्नासाठी बस्ता बांधण्याची परंपरा आहे. या बस्त्यासाठी एकाच कुटुंबातील अनेक जण सहभागी असतात. बस्ता बांधण्यासाठी येणाऱ्यांना स्वतंत्र प्रशस्त खोल्यांचीही सुविधा असेल. तेथे ते निवांतपणे खरेदी करू शकतील.
कापसे पैठणी पार्कच्या गच्चीत सौर उर्जा यंत्रणा उभारण्यात येणार. त्यामुळे हरित उर्जा उपलब्ध होईल. ५० किलोवॉटचा हा सौरप्रकल्प संपूर्ण कापसे पैठणी पार्कच्या उर्जेची गरज भागवेल.
सुविधा
कापसे संकुलात पैठणीच्या सेवेसाठी आम्ही सज्ज आहोत
कापसे पैठणी संकुलात आम्ही पैठणीनिर्मितीसाठी लागणाऱ्या साऱ्या सुविधा देत असतानाच काही पायाभूत सुविधांचीही आधुनिकरित्या मांडणी करत आहोत. ज्यामुळे भविष्यातील समस्यांना आणि पर्यावरणाच्या प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी हे संकुल सज्ज असेल. हे सगळे कशासाठी तर, पैठणीचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जपण्यासाठी…
पाणीपुरवठ्याची टाकी, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, रस्ते (सांडपाणी निचरा व्यवस्था आणि पावसाळी गटारे) सौरउर्जा निर्मिती यंत्रणा, उपहारगृह. सभागृह, अँफी थिएटर, क्रीडा आणि मनोरंजन संकुल, मंदिर आदी सुविधाही विकसित करण्यात येत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रही उभारले जात आहे.
- कर्मचारी कुटुंबीयांच्या मुलांसाठी शाळेची क्षमता : १ हजार विद्यार्थी
- रस्ते बांधणी : २१ किलोमीटर
- प्राथमिक आरोग्य केंद्र क्षमता : ५० बेडस्
- सौरउर्जा प्रकल्प यंत्रणा : १२०० किलोवॉट
- एकूण खर्च : ८१.५ कोटी
पैठणी विणण्याची कला
पैठणीचं माहेरघर असेलेलं येवला
नाशिक-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर नाशिक शहरापासून ८३ किलोमीटर अंतरावर वसलेलं येवला हे पैठणी उत्पादनातील प्रमुख केंद्र आहे. या गावाचा इतिहास एकोणिसाव्या शतकात घेऊन जाणारा आहे. त्या काळात रघोजी नाईक आपल्या समवेत रेशीम विणकरांना येवल्यात वास्तव्यासाठी घेऊन आले होते. पैठणी विणण्याच्या कलेला येवल्याने सामावून घेतले आणि उत्पादनासही प्रोत्साहन मिळाले.
10-12
प्रसिद्ध व्यापारी