आमच्याविषयी
कापसे फाउंडेशन
पैठणीची प्रतिष्ठा वाढविणारं प्रतिष्ठान
आमचं उद्दिष्ट्य
- पैठणी निर्मिती या भारताच्या विणकारी परंपरेतील सर्वाधिक प्राचीन कलेचे शाश्वत पद्धतीने जतन करणे; तसेच सरकार किंवा बिगर व्यावसायिक घटकांवरील अवलंबित्व कमी करणे.
- आज महाराष्ट्रातील येवला (नाशिक) हे पैठणीनिर्मितीतील सर्वोत्कृष्टतेचे केंद्र म्हणून आकाराला आहे. त्याचा गौरव वाढविण्यासाठी कापसे पैठणी पार्क महत्त्वाची भूमिका बजावेल.
- ग्रामीण महिला आणि अन्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तळागाळातील, आदिवासी नागरिकांच्या उन्नतीसाठी काम. या वर्गाच्या विकासासाठी त्यांना प्रतिबद्धता, प्रशिक्षण आणि रोजगाराची खात्री किंवा उदरनिर्वाहासाठी संधी यांची शाश्वती देणे.
- पूर्णपणे सेंद्रिय व पर्यावरणीय शाश्वत शेतीचा विकास अथवा निर्मिती आणि अधिकाधिक लोकांना याचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने त्याची व्यापकता वाढवणे.
- गायींच्या संगोपनासाठी प्राचीन भारतात हजारो वर्षांपासून गोशाला उभारण्याची पद्धती अवलंबली जाते. त्या गोशाळेचं जतन आणि विकास.
आमचं ध्येय
सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानसज्ज जगाने संपूर्णपणे शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार केला आहे. या जगाने सामाजिक पार्श्वभूमी, जात व पंथ, धर्म व वंश, स्त्री असो वा पुरुष किंवा अगदी शारीरिक कमतरता या पलीकडे जाऊन प्रत्येकाला समान संधी उपलब्ध व्हायला हवी.
कापसे फाउंडेशनचं काम कसं चालतं?
पैठणीच्या विणकामाची प्रक्रिया जतन करणं आणि तिचं मूळ स्वरूप जपणं या दोन्ही बाबतीत कापसे समूहाला यश आलं आहे. केवळ पैठणी निर्मिती नव्हे तर पैठणीच्या अनुषंगांनं येणारं सगळ्या गोष्टी जपणं आणि वाढवणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी पुढील वास्तू कापसे पैठणी पार्क येथे साकारत आहेत.
सुसज्ज उत्पादन विभाग
देखणी कर्मचारी वसाहत
आर्थिकदृष्ट्या कमकुवत कामगारांसाठी आणि विणकरांसाठी कापसे प्रतिष्ठानच्या वतीने कर्मचारी वसाहत उभारण्यात येत आहे. सध्या चार इमारती तयार झालेल्या असून तेथे एकूण ७१ सदनिका तयार आहेत. ६०० चौरसफूटांच्या या सदनिकांमध्ये सध्या ३३ कुटुंबे वास्तव्यास आहेत. आदिवासी आणि मूकबधीर व कर्णबधीर दिव्यांग विणकरांना मोफत निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
आलिशान पैठणी विक्रीदालन
कापसे पैठणी पार्कमधील तीन मजल्यांवर ८० हजार चौरस फूट प्रशस्त जागा उपलब्ध आहे. या विस्तारीत जागेतच के के हँन्डलूमचे रिटेल विक्रीदालन ग्राहकांच्या सेवेसाठी स्थलांतरित होणार आहे. विक्री कक्ष, संग्रहालय आणि कार्यालय हे तिन्ही विभाग एकाच पार्कमध्ये असल्याने सेवा आणि कार्यक्षमता कित्येक पटीने वृद्धींगत होणार आहे.
'कापसे समूह' या संकल्पनेचे संस्थापक
अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कापसे यांच्याविषयी…
- जन्म आणि बालपण
- १९८०-१९९० : संघर्षाचे दिवस
श्री. कापसे यांचा दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी परिस्थितीशी संघर्ष सुरू होता. या कष्टप्रद स्थितीत नववीमध्ये शाळा सोडावी लागली. स्थानिक उसाच्या शेतीत ते रोजंदारीवर काम करीत. त्यातून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावर ते आपल्या कुटुंबाच्या चरितार्थाबरोबरच शिक्षणाचा खर्चही काही प्रमाणात भागवत असत. परिसरातील कुटुंबांना गवत कापून देणे, गाई-गुरांसाठी चारा आणणे, शेणापासून गोवऱ्या तयार करून त्या विकणे आदी कामे ते करीत असत.
- १९९१-२००० : उद्योगाचे शिक्षण
श्री. कापसे यांनी सुरुवातीच्या काळात येवला येथील प्रसिद्ध ‘सोनी पैठणी’ दुकानाचे मालक श्री. सोनी यांच्या घरी घरकामगार म्हणून काम केले. त्यांचे परिश्रम आणि जिद्द पाहून काही काम करता करता वर्षांतच सोनी यांनी त्यांना आपल्या दुकानात सहायक म्हणून नोकरी दिली. त्यानंतर ते सोनी पैठणीचे विक्री प्रतिनिधी म्हणून काम पाहू लागले. सोनी पैठणीमध्ये काम करता करता, त्यांनी पैठणी व्यवसायातील सर्व खाचाखोचा शिकून घेतल्या. पैठणीचे प्रकार व नक्षीकाम, ग्राहकाची वर्तणूक व आवडनिवड, कच्च्या मालाचा स्रोत, हातमाग, विणकर व त्यांच्यासमोरील आव्हाने आणि एकूण हातमाग विणकाम उद्योग अशा सर्व घटकांचे सखोल ज्ञान त्यांना प्राप्त झाले.
- २०००-२०१० : स्वतंत्र पैठणी उत्पादन व विक्री
श्री. कापसे यांनी २००१ मध्ये स्वतंत्रपणे पैठणी उत्पादन आणि विक्री करण्यास प्रारंभ केला. याची सुरुवात येवल्यातील भाड्याने घेतलेल्या एका छोट्याशा (२०० स्क्वेअर फुट) दुकानात झाली. श्री. कापसे यांच्या एकाग्र वृत्तीमुळे आणि योजनांची जलदगतीने अंमलबजावणी करण्याच्या कौशल्यामुळे उद्योगाचा वेगाने विस्तार झाला. सन २००३ मध्ये त्यांच्या व्यवसायाचे येवल्यातील छोट्या जागेतून एक हजार स्क्वेअर फुटांच्या मोठ्या जागेत स्थलांतर झाले.
- उद्योगाचा विस्तार
व्यवसायावरील उत्कट प्रेम आणि उद्योगाचा विस्तार करण्याच्या तीव्र महत्त्वाकांक्षेमधून श्री. कापसे यांनी पुरवठा साखळीवर पूर्ण नियंत्रण आणण्यास सुरुवात केली. सन २००४ मध्ये त्यांनी बेंगळुरू येथे पैठणी उत्पादनाला सुरुवात केली. त्या वेळी त्यांनी पाच हातमाग आणि यंत्रमागाच्या साह्याने काम सुरू केले होते. आता याच पाच हातमाग व यंत्रमागांची संख्या आज १५० वर पोहोचली आहे. त्यामुळे पैठणी आणि अन्य साड्यांचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे.
- पैठणी व्यवसायाला सामाजिक बांधिलकीची जोड (२०११ पासून पुढे)
श्री. कापसे कौटुंबिक पार्श्वभूमी वंचितांची आहे. त्यामुळे विणकरांच्या वेदनांची त्यांना जाणीव आहे. एकूणच ग्रामीण व आदिवासी समाजाच्या स्थितीबद्दल त्यांना आत्यंतिक तळमळ आहे. त्या तळमळीतूनच त्यांनी गेल्या दशकभरात स्थानिक विणकरांसह मूक-बधीर व्यक्ती आणि ग्रामीण महिलांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कापसे समूहात विणकरांप्रमाणेच २०० पेक्षाही अधिक विक्री प्रतिनिधी आणि अन्य कामांसाठी आणखी १०० जणांचा कर्मचारीवर्ग आहे.
पैठणी व्यवसायासमवेत कापसे समूहाला शाश्वत शेती, दुग्ध व्यवसायामध्येही (गोशाला) रस आहे. श्री. कापसे हे पवन ‘मारुती जागृती देवस्थान’ आणि ‘गगनगिरी महाराज’ या संस्थांचे विश्वस्त म्हणूनही काम पाहतात. ‘सद्गुरू गगनगिरीजी महाराज नागरी पतसंस्थे’चे ते अध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त श्री. कापसे आपल्या समूहाच्या माध्यमातून आणि वैयक्तिकरीत्याही गेली काही वर्षे विविध प्रकारच्या सामाजिक कामांमध्ये कार्यरत आहेत.